कमाल चौक भागात गँगवार मधून खून

murder

नागपूर :- कमाल चौक शनिचरा बाजार येथे गँगवार मधून एका गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजताचे सुमारास घडली आहे . गौरव उर्फ पंड्या पिल्लेवान असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

गौरव आज रात्री ११ वाजताचे सुमारास आपल्या एका साथीदारसह शनिचरा बाजार येथील दारू भट्टी जवळ उभा असताना तीन ते चार जणांनी त्याचेवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. याप्रकरणी योगेश धनविजय या एका संशयित आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.गौरवने मागिल वर्षीआपल्या एका साथीदारासह कमाल चौक येथे एकाचा खून केला होता. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला होता असे सांगण्यात येते.

विनायक पुंड