मुलाच्या मृत्यु प्रकरणी पित्याची न्यायालयात धाव

Court

औरंगाबाद :- मशिदीत बेकायदा नळ लावल्याच्या व फळ विक्रेत्याला मारहाण झालेल्या अफेवेने उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी प्लास्टीक गोळ्यांनी केलेल्या गोळी बारात १७ वर्षीय मुलाचा मृत्यु झाला होता. या प्रकरणात मृत मुलाच्या वडिलांनी जिल्हा न्यायालयात फौजदारी अर्ज करून संबंधितांवर गुन्हा नोंदवण्याची विनंती न्यायालयाकडे केली हाेती. अर्जावरील सुनावणीनंतर प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीपाद टेकाळे यांनी मुलाच्या मृत्युप्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंदवून त्याचा स्वतंत्र तपास करावा असे आदेश दिले आहेत.

११ मे राेजी पहाटे दोन जातींमध्ये तणाव निर्मााण होऊन मोतीकारंजा, शहागंज व जिन्सी परिसरात दंगल उसळली होती. संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला चढवून तीन अधिकाऱ्यांना गंभीर जखमी केले. जमावाने पोलिसांच्या वाहंचे देखील ५५ हजारांचे नुकसान केले. तसेच संतप्त जमावाने शहागंज येथील लॉजवर पेट्रोल बॉम्ब फेकले. त्यामुळे लॉजला आग लागली. आगीत ७२ वर्षीय जगनलाल छगनलाला बन्सीले जिवंत जळाले. संतप्त जमाव पांगत नसल्याचे पाहून पोलिसांनी प्लास्टीकच्या गोळ्यांनी गोळीबार केला. यात १७ वर्षीय मुलाचा मृत्यु झाला. या प्रकरणात सिटी चौक पोलिस ठाण्यात १०, जिन्सी पोलिस ठाण्यात दोन तर क्रांतिचौक पोलिस ठाण्यात एक असे सुमारे १३ गुन्हे दाखल करण्यात आले.

ही बातमी पण वाचा : कोल्हापुरात गावठी दारू अड्डे अध्वस्त

या प्रकरणात मृत मुलगा अब्दुल हरिष कादरी (१७) याचे वडील मोहम्मद यांनी जिल्हा न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला. मुलाच्या मृत्युस कारणीभूत संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंत अर्जात करण्यात आली आहे. अर्जावरील सुनावाणीवेळी कादरी यंाच्यावतीने सर्वाेच्च न्यायालयातील पिपल्स युनियन फॉर सिव्हील लिबर्टीज विरूध्द महाराष्ट्र शासनाचा निकालाचा हवाला देत संबंधीतांवर गुन्हा नोंदवण्याची विनंती करण्यात आली.

सुनावणी दरम्यान सरकार पक्षाने सदरील सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा हा एन्काउंटरसंबंधी आहे. जमाव हिंस्त्र झाल्यास त्याला बळाचा वापर करून पांगविण्याचा अधिकार पोलिसांकडे आहे. त्यात कोणाला इजा झाल्यास तो गुन्हा ठरत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने वरील आदेश दिले.

दरम्यान आदेशाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.