मुरली गावितचे कांस्यपदक ‘रुपेरी’ होण्याची शक्यता !

Murali Gavit

मूळचा नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील पण नाशिक (Nashik) येथे प्रशिक्षित धावपटू मुरलीकुमार गावितचे (Muralikumar Gavit) आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद (Asian athletics championship) स्पर्धेतील कांस्यपदक रौप्यपदकात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्याने गेल्या वर्षी १० हजार मीटरमध्ये आशियाई कांस्यपदक जिंकले होते. मात्र मूळ रौप्यपदक विजेता बहारिनचा हसन चानी याला त्याने सादर केलेल्या माहितीत गडबडी आढळून आल्याने अपात्र ठरविले आहे. त्यामुळे त्याच्या जागी मुरलीला रौप्यपदक मिळण्याची शक्यता आहे.

ऍथलेटिक्स  इंटेग्रिटी युनिटच्या शिस्तपालन विभागाने चानी याला १६ मार्चपासून चार वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. 3 ऑगस्ट २०१७ ते १६ मार्च २०२० पर्यंतचे चानीचे सर्व स्पर्धांचे निकाल बाद ठरविण्यात आले आहेत. या निर्णयाविरोधात चानी स्वीत्झर्लंडमधील क्रीडा लवादाकडे अपील करू शकतो.

आशियाई अजिंक्यपद स्पर्धा दोहा येथे पार पडली होती. चानी याने २८ मिनिटे ३१.३० सेकंदाची वेळ नोंदवली होती तर मुरली गावितने २८ मिनिटे ३८.३४ सेकंदाची वेळ दिली होती. बहारिनच्याच दावित फिकादू याने २८ मिनिटे २६.३० सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले होते. चानी हा २०१८ च्या आशियाडचाही सुवर्णपदक विजेता आहे.

ही बातमी पण वाचा : नाओमी ओसोकाची फ्रेंच ओपनमधून माघार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER