इंग्लंडच्या नव्या संगीत अभ्यासक्रमात मलायकाच्या ‘मुन्नी बदनाम’ या गाण्याचाही समावेश

मुंबई : इंग्लंडमध्ये डिपार्टमेंट फॉर एज्युकेशनने (डीएफई) (DFE) सुरू केलेल्या नवीन संगीत अभ्यासक्रमात मलायका अरोरा (Malaika Arora) यांच चार्टबस्टर गाणं ‘मुन्नी बदनाम हुई’ (munni-badnaam-hui) समाविष्ट करण्यात आलं आहे. २०१० मध्ये आलेल्या दबंग या चित्रपटातील हे गाजलेलं गाणं आहे. जगभरातील संगीतामधील विविधता समजून घेण्यासाठी डीएफई विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम चालवते. या अगोदर किशोरी अमोणकर यांचे ‘सहेला रे’,अनुष्का शंकरचे ‘इंडियन समर, ए.आर. रहमान यांचे ‘जय हो’ ही भारतीय गाणी या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंडच्या संगीत क्षेत्रातील शिक्षक, संगीतकार आणि अभ्यासकांच्या १५ जणांच्या पॅनलने मिळून हा अभ्यासक्रम तयार केला आहे.

“आधुनिक ब्रिटिशांची ओळख ही समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे,हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्या ठिकाणी असे अनेक समुदाय आहेत जे त्यांची स्थानिक वैशिष्ट्ये संगीताच्या माध्यमातून एक्सप्लोर आणि साजरे करतात. अगदी त्यासारखीच परिस्थिती भारतात आहे. गानसरस्वती किशोरी अमोणकर या २० व्या शतकातील भारतीय शास्त्रीय संगीतातील आघाडीच्या गायिका होत्या.

संगीत हे परमात्माशी संवाद साधण्याचं एक माध्यम आहे.असा किशोरीताईंचा विश्वास होता. त्यांनी भारतीय शास्रीय संगीताच्या माध्यमाकडे अध्यात्माचं साधन म्हणून पाहिलं.जगविख्यात सतार वादक रवीशंकर आणि त्यांची कन्या अनुष्का शंकर यांच्या इन्ट्रुमेंटल मेलडीजचादेखील या अभ्यासक्रमात समावेश आहे.

डीएफईने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे की, ‘मुन्नी बदनाम हुई’ हे बॉलिवूडच्या चित्रपटातील आयटम गाण्यांपैकी एक आहे. अशा गाण्यांचा चित्रपटाच्या कथानकाशी थेट संबंध नसतो. पण या गाण्याचं चित्रकरण आकर्षक आहे आणि गाण्याच्या चालीत सांगितिक वैशिष्ट्य आहेत म्हणून आम्ही त्याचा समावेश केला आहे. आम्ही प्रॅक्टिकल पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यातही शिक्षकांना प्रत्येक इयत्तेला शिकवणं सोपं जावं हाही आमचा प्रयत्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button