मुन्नाभाई तीन पुढील वर्षी सुरु होणार?

Rajkumar Hirani - Munna Bhai

राजकुमार हिरानीने (Rajkumar Hirani) संजय दत्तला (Sanjay Dutt) मुन्नाभाई (Munna Bhai) बनवत या सीरीजमधील ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ हे दोन सिनेमे तयार केले होते. संजय दत्त आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांच्या जोडीने या दोन्ही सिनेमात धुमाकूळ घातला होता. सिनेमाचे दोन्ही भाग प्रचंड यशस्वी झाले होेते. त्यानंतर मुन्नाभाईचा तिसरा सिनेमा तयार करण्याची योजना आखण्यात आली होती. ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ असे नाव ठेऊन सिनेमा सुरु करण्यात येणार होता. परंतु काही कारणामुळे हा सिनेमा तयारच झाला नाही. त्यानंतर अधे मध्ये पुन्हा एकदा मुन्नाभाई तयार होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. पण काहीही झाले नाही. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा मुन्नाभाईची चर्चा सुरु झाली होती. त्यातच आता स्वतः अर्शद वारसीनेच मुन्नाभाई सीरीजमधील तिसरा भाग पुढील वर्षी सुरु होऊ शकतो असे म्हटले आहे.

विधु विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) निर्मित आणि राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमात मुन्नाभाईच्या भूमिेकेसाठी सर्वप्रथम शाहरुख खानला (Shahrukh Khan) विचारण्यात आले होते. संजय दत्तला जिमी शेरगिलच्या भूमिकेसाठी घेण्याचा विचार करण्यात आला होता. पण शाहरुखने नकार दिल्याने संजय दत्तची मुन्नाभाईच्या कॅरेक्टरमध्ये वर्णी लागली होती. अर्शदने तिसऱ्या भागाबाबत बोलताना सांगितले, मुन्नाभाईच्या तिसऱ्या भागासाठी आजवर तीन कथा तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक कथा फायनल करण्यात आली असून पुढील वर्षी सिनेमाचे शूटिंग सुरु होऊ सकते. मात्र निर्माता विधु विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी यांनी मात्र या विषयावर मौन बाळगण्याचेच ठरवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER