महापालिका पथकाकडून दिवसात ६४ हजारांवर दंड वसूल : आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे

डॉ.कादंबरी बलकवडे

कोल्हापूर : दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर कोरोना (Corona) प्रतिबंधक उपाययोजनांचा भंग केल्याबद्दल काल एका दिवसात महानगरपालिका पथकाकडून ५२२ जणांकडून ६४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे (Dr. Kadambari Balkawade,) यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न ठेवणे, हॅण्डग्लोज न वापरणे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल काल गुरुवार दि. ५ नोव्हेंबर रोजी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून केवळ एका दिवसात ६४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.

यामध्ये विनामास्क फिरणाऱ्या ४८५ जणांकडून ४८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर सामाजिक अंतर न ठेवल्याबददल १० जणांकडून ६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे, मास्क व हॅण्डग्लोज न वापरल्याबददल १८ जणांकडून ३ हजार ६०० रुपायांचा दंड आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबददल ९ जणांकडून १ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणाव्यात, असे आवाहन करून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, शहरवासीयांनी तसेच व्यापारी, व्यावसायिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी विशेषत: रस्त्यांवर न थुंकणे या बाबींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER