ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेचे ‘मिशन मोड’; मुंबई आयुक्तांचे आदेश

Iqbal Singh Chahal

मुंबई :- मुंबईत रुग्णांना ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे मोठी समस्या उद्भवली आहे. या प्रसंगी रुग्णाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून महापालिकेने ‘मिशन मोड’ हाती घेतले आहे. ऑक्सिनज उत्पादक आणि पुरवठादार यांनी देखील ‘मिशन मोड’ वर कार्यवाही करावी, असे आदेश आयुक्त इक्बालसिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या ६ रुग्णालयातील १६८ रुग्णांना १७ एप्रिल रोजी ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या रुग्णालये आणि समर्पित कोरोना आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात कार्यप्रणालीमध्ये अधिक सुसूत्रता व समन्वय साधण्यासाठी आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी आज आढावा बैठक घेतली. अतिरिक्त महापालिका आयुक्त आश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यासह महापालिकेचे विविध सह आयुक्त, उपआयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता तसेच वैद्यकीय अधीक्षक आणि अन्न व औषध प्रशासनाचे इतर अधिकारी, विविध प्राणवायू उत्पादक तसेच पुरवठादार या बैठकीत उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्राला मिळणार सर्वाधिक 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन ; पीयूष गोयल यांची माहिती 

आयुक्तांचे आदेश
“कोरोना (Corona) रुग्णांसाठी ऑक्सिजनची सर्वत्र गरज निर्माण झाली आहे. यामुळे अन्न व औषध प्रशासनासह ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादार यांच्यावर ताण आला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला मिळणारा २३५ मॅट्रिक टन ऑक्सिजन साठा कमी करण्यात येऊ नये. ऑक्सिजन उत्पादन स्थळापासून त्याची वाहतूक आणि सर्व कोरोना रुग्णालये व केंद्र तसेच इतर रुग्णालयांमध्ये त्याचे वितरण होईपर्यंतच्या सर्व बाबींवर देखरेख करण्यासाठी महापालिकेची पथके नेमण्यात येतील. ही पथके रोज प्राप्त झालेला ऑक्सिजन साठा किती व त्याची माहिती गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह करतील. यामुळे रोज मागणीच्या तुलनेत किती ऑक्सिजन रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतो, यावर देखरेख करता येईल.” अशा सूचना चहल यांनी दिल्या.

त्याचबरोबर, रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी सर्वांनी ‘मिशन मोड’वरच काम करावे, असे आदेशही चाहूल यांनी दिले. यास सहमती दर्शविताना अन्न व औषध प्रशासन आयुक्त काळे म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन महानगरपालिकेकडे सर्व आवश्यक सहाय्य करेल. असे चाहूल यांनी स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा : एसटीचे ड्रायव्हर आणणार ऑक्सिजन टँकर; अनिल परब यांची माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button