महापालिकेत मदत, आता शिवसेनाही राष्ट्रवादी, समाजवादीला परतफेड करणार

NCP - Samajwadi Party - Shiv Sena

मुंबई : राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) नेतृत्त्वाखाली हे सरकार यशस्वी घौडदौड करत आहे. राज्यातील सत्ताधारी एकता इतर ठिकाणीही दिसून येत आहे. नुकतेच मुंबई महापालिकेच्या वैधानिक समित्यांच्या निवडणुका मुंबई महापालिकेत शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. यंदाही राष्ट्रवादी (NCP) आणि समाजवादी पक्षाने शिवसेनेचे वर्चस्व काय राखण्यात मदत केली आहे. त्याची बक्षिसी शिवसेना राष्ट्रवादी आणि समाजवादीला प्रभाग समित्यांमध्ये देणार आहे.

महापालिकेच्या स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट या वैधानिक समित्यांसह विशेष समित्यांच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला केलेल्या मदतीची बक्षिसी या दोन्ही पक्षांना दिली जाणार आहे. गोवंडी व कुर्ला या दोन प्रभाग समित्यांमध्ये सेना आपले उमेदवार उभे न करता त्या राष्ट्रवादी आणि समाजवादीच्या उमेदवारांसाठी सोडणार आहे.

महापालिकेच्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते आपल्याकडे वळवण्यात शिवसेना यशस्वी ठरली. आणि काँग्रेसला तटस्थ ठेवून विरोधी पक्ष म्हणून त्यांचे स्थानही अबाधित राखण्याचा प्रयत्न सेनेने केला. या बदल्यात समाजवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभाग समित्या सोडण्याची तयारी सेनेने केली आहे. समाजवादी पक्षाला गोवंडी एम/ पूर्व प्रभाग समिती आणि राष्ट्रवादीला कुर्ला एल प्रभाग समिती सोडण्यात येणार आहे. यावर्षी या दोन समित्या घेतल्यास त्यांना पुढील वर्षी विशेष समिती सोडली जाऊ शकते, अशी माहिती सेनेतील सूत्रांनी दिली.

समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते आमदार रईस शेख यांनीही या माहिताला दुजोरा दिला आहे. सेनेकडून असा प्रस्ताव आला असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच  याबाबत आमचा पक्ष लवकरच सेनेला उत्तर पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तेव्हाच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू,असेही रइस शेख म्हणाले.

तसेच, शेख म्हणाले, समाजवादी पक्ष हा कष्टकऱ्यांचा, सामान्यांचा धर्मनिरपेक्ष पक आहे. भाजपसारख्या जातीयवादी पक्षाला दूर ठेवण्यासाठी आम्ही सेनेला मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER