महापालिका निवडणूक : मंगळवारी राज ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता

Raj Thackeray

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) जय्यत तयारी केली आहे. मंगळवार १२ जानेवारीला मनसेची महत्त्वाची  राज्यस्तरीय बैठक होणार आहे. सकाळी ११ वाजता वांद्रेतील एमआय जी क्लब इथं ही बैठक होणार आहे. यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडील अहवालाच्या स्वरूपात पक्षाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

स्थानिक स्तरावरील निवडणुका आणि पक्षाची तयारी, पक्ष संघटन आणि बांधणी, स्थानिक स्तरावर राजकीय आणि सामाजिक स्थिती, लोकांचा कल, पक्षात रिक्त असलेल्या पदांच्या नियुक्त्या याबाबत पदाधिकाऱ्यांनी लेखी अहवाल पक्षाला देण्याची सूचना देण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांत कृष्णकुंजवर बैठकांचं आणि पक्षप्रवेशाचं सत्र सुरू आहे. या बैठकांमध्ये राज ठाकरे विविध जिल्ह्यांतील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत आहेत. सोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा जोमाने उतरेल, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मनसेकडून कम बॅक करण्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

मनसेच्या जुन्या आणि निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी ७ डिसेंबरला ‘कृष्णकुंज’वर जात राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी राज ठाकरे यांनी नाशिक मनसेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी नवीन वर्षात नाशिक दौरा करणार असल्याचे सांगितल्यानं मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER