राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर

Kalyan Dombivali and Kolhapur Municipal Corporation

मुंबई : कोल्हापूर (Kolhapur) आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेची (Kalyan-Dombivali Municipal Corporation) मुदत संपत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकांना आणखी सहा महिने मुदतवाढ दिल्याचा निर्णय हेण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकाही लांबणीवर पडणार आहे. यामुळे या महापालिकांवरही काही महिने प्रशासक येणे अटळ आहे. नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार महापालिकेसह राज्यातील 12 नागरी स्थानिक संस्थांमधील प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी सहा महिन्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER