मनपा निवडणूक : एमआयएमच्या प्रचारासाठी बिहारमधले पाच आमदार मुंबईत

एमआयएमच्या प्रचारासाठी बिहारमधले ५ आमदार मुंबईत

मुंबई : आशियातील सर्वांत  श्रीमंत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमच्या (MIM) प्रचारासाठी पक्षाने बिहारमधील पाच  आमदारांना मुंबईत आणले आहे. हे आमदार बिहारी आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत.

मुंबईत (Mumbai) बिहारमधील (Bihar) नागरिकांची मोठी संख्या आहे. अनेक मतदारसंघात बिहारी मते निर्णायक आहेत. महत्त्वाचे म्हणजे बिहारमधील एकाही प्रादेशिक पक्षाचे मुंबईत अस्तित्व नाही. त्यामुळे या बिहारी जनतेचा आवाज बनण्याचे काम एमआयएमने सुरू केले आहे. एमआयएमच बिहारी जनतेची तारणहार असल्याचे दाखवून बिहारी मते खेचण्याचा एमआयएमचा प्लॅन आहे. मुस्लिम मतदारही मुंबईत मोठ्या संख्येत आहेत. अनेक ठिकाणी त्यांची संख्या निर्णायक असून तिथे मुस्लिम उमेदवारच निवडून येत असतो.

अशा वॉर्डांवर एमआयएमने लक्ष केंद्रित केले आहे. महापालिका निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. मात्र, एमआयएमने कामाला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आमची तयारी सुरू असून त्याचा आढावा घेण्यासाठीच आम्ही मुंबईत आलो आहोत, असे एमआयएमचे बिहारचे आमदार अख्तरुल ईमान यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER