दोन महिन्यातच महापालिका निवडणुकीचे बिगुल : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कोल्हापूर :- पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील विजयाने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे लवकरच महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजेल. दोन महिन्यातच या निवडणुका होतील. यापार्श्वभूमीवर भाजप-ताराराणी आघाडीतर्फे मिशन महापालिका (Municipal Election) सुरु केले असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा राज्य निवडणूक आयोगाच्या हातातील विषय आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार या निवडणुका होतात. कोल्हापूर (Kolhapur) महापालिकेची निवडणुकही त्यामुळेच कधीही लागू शकते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास वाढला आहे. या हवेवर महापालिका निवडणुकीत लाभ होईल असा त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे निवडणुका लवकरच जाहीर होतील असा अंदाज आहे. भाजप आणि ताराराणी आघाडीच्या रोज दोन ते चार नगरसेवकांना घरी जावून भेटत आहे. तसेच इतर प्रभागात इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. यानिवडणुकीत भाजप आणि ताराराणी आघाडी एकत्र लढेल, असे आ. पाटील यांनी स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा : शेतकरी आंदोलनामुळे भाजपला राजकीय फायदाच होईल : आ. चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER