महापालिका शिक्षण विभाग नेमणार 79 तासिका शिक्षक

Municipal Education Department

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आता तासीका स्वरुपावर शिक्षक घेतले जाणार आहेत. त्यानुसार मराठी 11, उर्दू माध्यमासाठी 04 व इंग्रजी माध्यमासाठी 4 असे एकूण 19 माध्यमिक शाळा आहेत. परंतु या शाळांना शिक्षकांची कमतरता असल्याची बाब समोर आली आहे. त्या अनुषंगाने 79 तासीका शिक्षक भरती करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव सोमवारी होणा:या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.

महापालिकेच्या शाळांच्या नववी आणि दहावीच्या वर्गात 3878 विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. परंतु याठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे. महापालिका शाळांवर तासिका शिक्षक घेण्यासंदर्भातील ठरावाला यापूर्वीच महासभेने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार तात्पुरत्या स्वरुपात शिकवणी शुल्कावर शिक्षक भरण्यास परवानगी देण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका शाळांमधील विद्याथ्र्याचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी या शिक्षकांची नेमणुक केली जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक शिक्षकाला तासाचे 150 रुपये दिले जाणार आहेत.

ठाण्याच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा

त्यानुसार पाच दिवसाप्रमाणो 750 रुपये एका शिक्षकाला दिले जाणार आहे. त्यानुसार 79 शिक्षकांसाठी 15 लाख 40 हजार 500 रुपये एवढा खर्च प्रत्येक महिन्याला पालिकेला येणार आहे. त्यानुसार पुढील 10 महिन्यांसाठी हे शिक्षक नेमले जाणार आहेत. त्यानुसार यासाठी 1 कोटी 67 लाख 55 हजारांचा खर्च या शिक्षकांसाठी केला जाणार आहे. महापालिकेच्या शाळा क्रमांक 1 ते 19 यामधील माध्यमिक वर्गाच्या विद्याथ्र्याना हे शिक्षक शिकविणार आहेत. त्यानुसार सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांची निवड यासाठी केली जाणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.