महापालिकेचे ‘ग्लोबल टेंडर’ रद्द; एकही कंपनी पात्र ठरली नाही

BMC - Coronavirus Vaccine

मुंबई : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरणाचा (Coronavirus Vaccination) वेग वाढवण्यासाठी महापालिकेने ग्लोबल टेंडर काढले होते. मात्र, या प्रक्रियेत भाग घेतलेल्या ९ कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र ठरली नाही आणि हे टेंडर रद्द करण्यात आले. यामुळे पालिकेच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. तसेच नव्याने टेंडर प्रक्रिया करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबईत लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिकेने ग्लोबल टेंडर काढले. मात्र, या टेंडरमधून एका पुरवठादाराने माघार घेतली होती. ९ कंपन्या या टेंडर प्रक्रियेत होत्या. मात्र, या कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र न ठरल्यामुळे ग्लोबल टेंडर प्रक्रिया रद्द झाली. या प्रक्रियेत एकही कंपनीने भाग न घेतल्यामुळे लस पुरवठ्याच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणारी कंपनी मिळू शकली नाही. त्यामुळे आता केंद्राकडून येणाऱ्या लसींवरच पालिकेची सर्व भिस्त असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button