इचलकरंजीला लवकरच महापालिका : नगरविकासमंत्री शिंदे

Eknath Shinde

कोल्हापूर : इचलकरंजी शहराची नव्या जनगणनेत आवश्यक लोकसंख्या झालेली असेल. यामुळे याबाबत गांभीर्याने विचार करू आणि लवकरच इचलकरंजीला महापालिका स्थापन करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असताना दिली.

सभागृहात आयोजित नगरपालिका आढावा बैठकीत इचलकरंजी शहराला प्रदूषण नियंत्रणासह अन्य विकासकामांसाठी निधी द्यावा, अशी मागणी खा. धैर्यशील माने यांनी केली होती. त्यावर शिंदे म्हणाले, महापालिकेसाठी लोकसंख्येचा २०११ च्या जनगणनेनुसार आमदार प्रकाश आबिटकर आणि आमदार प्रकाश आवाडे यांनी मागणी केल्याप्रमाणे गारगोटी आणि शिरोली (ता. हातकणंगले) येथेही लोकसंख्या पाहता हा निकष आता पूर्ण झाला असेल तर नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER