मनपाने ‘मराठी भाषादिन’ कार्यक्रमाचे फलक काढून फेकले – मनसे

MNS

मुंबई : ‘मराठी भाषादिना’निमित्त मनसेने एक दिवसासाठी लावलेले फलक महापालिकेने काढून फेकल्याचा मनसेने निषेध केला आहे.

याबाबत मनसेचे नेते अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे म्हणाले की – ‘मराठी भाषादिना’निमित्त मनसेने एक वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचे फलक एक दिवसापुरते दादर भागात लावले होते. शहराच्या सौंदर्याला बाधा येणार नाही याची काळजी घेतली होती. दुसऱ्या दिवशी ते फलक उतरवले जातील याची पूर्ण काळजी मनसेने घेतली होती. तरीही मनपाने ते काढून टाकले.

मराठीचा कळवळा असणाऱ्या पक्षाची सत्ता असतानाही आमचे ‘मराठी भाषादिना’चे फलक काढण्याच्या महापालिकेच्या मुजोरीला काय म्हणायचे? आम्ही मराठी भाषादिन साजरा करायचा नाही का ? यांचे राजकीय फलक मिरवलेले चालतात; पण ‘मराठी’ फलकांना यांच्या लेखी काहीच किंमत नाही?