महापालिकेच्या पथकाला गुलमंडीवरील व्यापाऱ्यांनी मारहाण

Municipal Corporation team beaten

औरंगाबाद : मास्क नसलेल्या एका विद्यार्थ्याला अडवून दंड वसूल करणाऱ्या पथकाला समजावून सांगत असताना मुजोरी करणाऱ्या महापालिकेच्या पथकाला (Municipal Corporation team) गुलमंडीवरील व्यापाऱ्यांनी मारहाण केली.

ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. गुलमंडीवर सोमवारी सायंकाळी महापालिकेचे पथक मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत होते. त्यावेळी या पथकाने एका विद्यार्थ्याला पकडले. त्याच्याकडून दंडाची वसुली केली जात होती. विद्यार्थी गायवया करत असताना तेथे उपस्थित असलेले माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी पथकाला समजावून सांगितले. मात्र, पथक काही एक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तेवढ्यात माजी आमदार किशनचंद तनवाणी देखील तेथे आले. त्यांनी देखील पथकाला हवे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो पण त्या विद्यार्थ्याला सोडा असे म्हणाले. त्यावर पथकाने तनवाणी यांना अरेरावीची भाषा केली. त्यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांनी पथकाला चांगलाच चोप दिला.

दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर पथकाने सुरुवातीला सिटीचौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. या पथकाला तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. मात्र, वृत्त देईपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

फेरीवाल्यांना कोरोनाची भीती दाखवत महापालिकेचे पथक पाच हजार रुपयांची पावती देत आहे. यामुळे परिसरातील फेरीवाले आणि व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. विशेष म्हणजे अनेक व्यापाऱ्यांना पथकाकडून पावती न देता वसुली केली जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे. याप्रकरणी मनपा अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER