महापालिका निवळणुका स्वबळावर लढावीत : मनसे कार्यकर्त्यांची मागणी

MNS

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यात मनसे (MNS) नेत्यांची बैठक घेतली होती. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकांसाठी (Mahanagarpalika Elections) मनसेची जोरदार तयारी सुरू आहे. नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद महापालिकाचे निवडणुका पार पडणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे-भाजपची युती चर्चेत आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनीही महापालिका निवडणुका स्वबळावर लढावी, अशी मागणी केली. तसेच मतदारसंघानिहाय मनसे नेत्यांच्या बैठका सुरूच आहेत. मुलुंड येथे मनसे नेते अमित ठाकरे आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत संदीप देशपांडे म्हणाले की, “सध्या विविध भागात मनसेच्या बैठका होत आहेत, गेल्या दोन दिवसांपासून हे सुरू आहे, आजही बैठक होणार, महाराष्ट्र सैनिकांशीदेखील संवाद सुरू आहे. २०१७ च्या निवडणुकीत जे मतदान झाले, त्यापेक्षा दुप्पट मतदान २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला मिळाले आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेत २२७ वार्ड पूर्ण ताकदीने लढले पाहिजे, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे, परंतु किती व कोणत्या जागा लढवायच्या याचा सर्वस्वी निर्णय राजसाहेब घेतील,” असेही देशपांडे म्हणाले.

अमित ठाकरेंची क्रेझ

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ईशान्य मुंबईची जबाबदारी अमित ठाकरे यांना दिली आहे, त्यानुसार ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत, त्यामुळे प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे. महाराष्ट्र सैनिकात आणि तरूण पिढीत अमित ठाकरेंचा क्रेझ आहे. महापालिकेच्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका राहील. महापालिका निवडणुकीपूर्वी प्रत्येक वार्डाचा आढावा घेतला जात आहे. कोणती कामे केल्यानंतर मत वाढतील, यासाठी रणनीती आखली जात आहे, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER