महापालिका आयुक्तांचा आदर्श : स्वच्छतेसाठी हातात घेतला झाडू

Kolhapur MNC

कोल्हापूर : महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पदभार स्विकारल्यापासून नाविन्यपूर्ण योजना आखत शहरवासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेच्या ७९ व्या रविवारी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्वत: हातात झाडू घेवून सहभाग नोंदविला. त्यांनी महापालिका आयुक्त पदभार स्विकारल्यापासून प्रशासकीय दिरंगाई कमी करुन नागरिकांना महापालिका प्रशासनाकडून जलदगतीने सेवा मिळावी यासाठी प्रयत्नात आहेत. थेट संपर्क आणि पारदर्शी कारभार अशी ख्याती असलेल्या डॉ. कादंबरी यांच्या कामकाज पध्दतीवर कोल्हापूर पसंती देत असल्याचे चित्र आहे.

छत्रपती शाहू उद्यान परिसरात आयुक्त डॉ. बलकवडे यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. नागरिकांना शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. शहरात विविध सामाजिक संस्थाच्या सहभागाने दुर्मिळ आणि औषधी वनस्पती लावण्यात येत आहेत. आयुक्त डॉ. बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरा फौंडेशनतर्फे छत्रपती शाहू उद्यान परिसरात ४० तसेच वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेने १०० वनस्पतीची लागवड केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER