ठाण्यातील मृतदेह अदलाबदल प्रकरण : महापालिका आयुक्तांकडून दिलगिरी व्यक्त

Thane Mahapalika

ठाणे : ठाणे महापालिकेने नुकत्याच सुरू केलेल्या ग्लोबल हब येथील कोविड रुग्णालयात मृतदेहांच्या अदलाबदलीप्रकरणी मी संबंधित कुटुंबाची व्यक्तिशः माफी मागतो, अशा शब्दांत आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी गुरुवारी दिलगिरी व्यक्त केली.

या प्रकरणी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रूपेश शर्मा यांची तातडीने बदली करण्यात आली असून चार परिचारिकांना कागदपत्रांतील घोळ झाल्याने निलंबित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. ठाणे महापालिकेने बाळकुम येथे नव्यानेच सुरू केलेल्या कोविड रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक रुग्ण बेपत्ता झाल्याची तक्रार समोर आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रुग्णांच्या मृतदेहामध्ये अदलाबदली झाल्याचे प्रकरणही उघड झाले होते. यामुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

भाजपने या प्रकरणी थेट राज्यपालांची भेट घेतल्याने सत्ताधारी शिवसेनेतही यामुळे अस्वस्थता होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत जाहीर दिलगिरी व्यक्त केली. तसेच यापुढे कोणत्या उपाययोजना हाती घेतल्या जातील याचीही माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER