आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना मुनगंटीवारांची जीभ घसरली ; अजितदादांनी सुनावले खडेबोल

Ajit Pawar - Aaditya Thackeray - Sudhir Mungantiwar

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजपमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत .

भाजपचे (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाविकास आघाडी सरकार उडाणटप्पू सरकार आहे, करंटं सरकार आहे, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले. तसंच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याबद्दल बोलताना मुनगंटीवार याची जीभ घसरली .

आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले. सुधीर मुनगंटीवार यांनी आजही ठाकरे सरकारवर चौफेर टीका केली.

‘हे सरकार उडाणटप्पू आहे आणि हा संसदीय शब्द आहे. विधानसभा चमकवण्यासाठी १५ कोटी रुपये आहेत; पण गोर-गरिबांसाठी पैसै नाही. कोविड योद्धे म्हणून अभिनंदन करता आणि त्यांना देण्यासाठी सहा-सहा  महिने पैसे नाही हे करंटं सरकार आहे.’ अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

‘आमची अजित पवारांशी ७२ तासांची मैत्री होती; पण तरीही मैत्री कायम आहे. पण शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसने (Congress) एकत्र येत सरकार स्थापन केले हा राजकीय लव्ह जिहाद होता’, असा टोला मुनगंटीवार यांनी सेनेला लगावला.

त्यानंतर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ आणि नंतर ‘मी जबाबदार’ या महाविकास आघाडी सरकारच्या मोहिमेची मुनगंटीवार यांनी खिल्ली उडवली आणि आदित्य ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत टीका केली. अजित पवार यांनी सभागृहात अशी व्यक्तिगत टीका करू नये, अशी विनंती केली. त्यानंतर अध्यक्षांनी मुनगंटीवार यांचे विधान पटलावरून काढून टाकले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER