तुमची चौकशी होईल, तेव्हा रडू नका : मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar - CM Uddhav Thackeray

मुंबई : तुमची चौकशी होईल, तेव्हा रडू नका, असा इशारा भाजपा नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. आज शनिवारी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा इशारा दिला.

फडणवीस सरकारच्या काळातील वृक्षलागवडीची चौकशी करण्यात येईल, असे महाविकास आघाडी सरकारने म्हटले आहे. यावरून सदर मुलाखतीत मुनगंटीवार यांनी आज राज्य सरकारला धारेवर धरले. यावेळी बोलताना ते म्हणाले, वृक्षलागवड हे ईश्वरीकार्य असून, तुम्हाला वृक्षलागवडीची चौकशीच करायची असेल, तर वनसचिवांकडून न करता ही चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत करा.

या सरकारमध्ये किती दम आहे, तेदेखील आम्हाला कळून येईल. तुम्ही आम्हाला इतरांसारखेच समजत असाल, तर तुम्ही आगीशी खेळत आहात, हे लक्षात ठेवा, असा इशाराही यावेळी मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला दिला.