मुंडेंचे मंत्रिपद धोक्यात, शरद पवार – उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष, चित्रकुटवर जमले समर्थक आणि अधिकारी

dhanajay Munde

मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) रेणु शर्मा नावाच्या एका बॉलिवूड (Bollywood) गायीकेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहे. त्यातच धनंजय मुंडेंनी आपली भूमिका माडताना रेणु शर्मा ही त्यांच्या दुसरी पत्नीची बहिण असल्याचे सांगत रेणुने केले आरोप फेटाळले आहे. असे असले तरी धनंजय मुंडेंनी आतापर्यंत दुस-या पत्निविषयी लपविले असल्याचा आरोप करत विरोधक आक्रमक झाले आहेत.

धनंजय मुंडे यांनी सावधगिरी बाळगत, विना ताफा, माध्यमांची नजर चुकवत भल्या पहाटेच शासकीय चित्रकुट बंगल्यावर पोहचलेत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी चित्रकूट बंगल्याबाहेर कार्यकर्ते दाखल झाले आहेत.

धनंजय मुंडे भल्या पहाटेच चित्रकूट बंगल्यात दाखल झाले. त्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते निवासस्थानावर दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे यांनी घराबाहेर न पडता आपल्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निवास्थानावरच बोलवले आहे. शासकीय अधिकारी आणि मुंडे यांच्यात बैठकही सुरु आहे.

मुंबईच्या (Mumbai) मलबार हिल येथील चित्रकूट बंगल्यावर येताना गुरुवारी पहाटेही धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना खबर लागणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. पहाटे अडीच-तीनच्या सुमारास धनंजय मुंडे एका खासगी गाडीतून चित्रकूट बंगल्यावर आले. या गाडीच्या काचा काळ्या असल्यामुळे आत नेमके कोण बसले आहे, याचा अंदाज पटकन येणे शक्य नव्हते. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासोबत नेहमीप्रमाणे पोलीस आणि सुरक्षारक्षकांचा ताफा नव्हता. ते एकटेच चित्रकूट बंगल्यावर आले होते.

बलात्काराच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे सध्या प्रचंड अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray)आता या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘धनंजय मुंडेंच्या प्रकरणात आमचा हस्तक्षेप नाही’, राष्ट्रवादीची पहिली अधिकृत प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER