मुंडे भगिनींनी गुढी उभारत साजरा केला राम मंदिर भूमिपूजनाचा जल्लोष

Pankaja Munde-Pritam Munde

मुंबई : खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी घरातच रामाची पूजा-अर्चना करत सोहळा अनुभवला. मुंडे भगिनींनी घरातच रामाची प्रतिमा, मूर्ती आणि रामरक्षा स्तोत्राचे पुस्तक ठेवून प्रभू रामाचंद्रांची मनोभावे पूजा केली.

ही बातमी पण वाचा:- गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न आज साकार झाले आहे – मोदी

प्रितम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांना मिठाई भरवून या भूमिपूजनाचा आनंद साजरा केला . पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट करत ‘जय श्रीराम !!’ असे कॅप्शन दिले . तसेच “वयाच्या आठव्या वर्षापासून घर परिवारात ‘जय श्रीराम’ हा जयघोष ऐकत आले. मुंडे साहेब आणि त्यांच्या बरोबरीने असंख्य लोकांना कारसेवक म्हणून गेलेले पाहिले, सन्माननिय अडवाणीजींची रथयात्रा पाहिली. त्यासर्वांचे प्रयत्न पूर्णत्वास घेऊन जाणारा राम मंदिराच्या भूमिपूजनाचा हा सुवर्णदिन निश्चितच अभिमानाचा आहे”, अशा भावना खासदार प्रितम मुंडे यांनी व्यक्त केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER