शरद पवारांच्या बैठकीत मुंडे बहिण भाऊ आनंदाने एकत्रित

Pankanja Munde & Dhanajay munde

पुणे : बीडच्या राजकारणातील महत्त्वाचे दोन चेहरे म्हणजे पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde). या बहिण भावांमधील राजकीय भांडण असो अथवा राजकीय भेटीगाठी असो. राज्यात चर्चेचा विषय नक्की ठरतो.

एरवी राजकारणातून एकमेकांवर चिकल फेकणारे भावंड, आज तब्बल एक वर्षानंतर एकत्रित पाहायला मिळाले. शरद पवारांच्या (Sharad Pawar) अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या बैठकीत एकत्रित आले होते. ऊसतोड कामगरांच्या प्रश्नांसंदर्भात पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या, माजी मंत्री, पंकजा मुंडे एकत्रित दिसले. ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये ‘गोडवा’ पाहायला मिळाला.

बैठकीदरम्यान पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हास्यविनोद रंगलेले पाहायला मिळाले. गेल्या वर्षी निवडणुकीअगोदर बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एका व्यासपीठावर आले होते. त्यानंतर आज तब्बल एका वर्षानंतर ते एकत्र आले. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात काही वेळ चर्चा झाली. जनतेच्या प्रश्नासाठी एकत्र आलं तर यात वावगं काय, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी बैठकीनंतर दिली.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांच्या ‘त्या’ बैठकीला पंकजा मुंडेसह सुरेश धसांना नाकारला प्रवेश ; कार्यकर्त्यांचा राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER