मुंडेसाहेबांचा लाडका युवा नेता हरपला; पंकजा मुंडेंकडून सातव यांना श्रद्धांजली

Pankaja Munde - Rajiv Satav - Gopinath Munde

मुंबई :- काँग्रेसचे (Congress) नेते आणि राज्यसभेतील खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचं आज पुण्यात निधन झालं. राजीव सातव यांनी कोरोनावर (Corona) मात केली होती. मात्र, फुफ्फुसात संसर्ग झाल्यानं त्यांची प्रकृती बिघडली होती. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्या निधानाबद्दल राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांकडून दुःख व्यक्त करण्यात आलं आहे. भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीदेखील दुःख व्यक्त केले असून, “मुंडेसाहेबांचा लाडका युवा नेता हरपला.” अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी ट्विटद्वारे भावना व्यक्त केल्या असून, “सामान्य समाजासाठी धडपडणारा, एक तरुण उमदा, युवा नेता राजीव सातवच्या रूपाने आज आपण गमावलेला आहे. ज्यांनी आपलं आयुष्य कष्टामध्ये घालवून अनेक लोकांचे हात एका जीवनाला लागतात जेव्हा तो एका उंचीवर पोहचत असतो आणि तो त्या उंचीवरून अनेक जीवनांना स्पर्श करत असतो. अशा प्रवासाचं एक उदाहरण असलेल्या राजीव सातवचा घास या क्रूर कोरोनाने घेतला. मी मनापासून दुःख व्यक्त करते. सातव परिवाराच्या दुःखात समस्त मुंडे परिवार सहभागी आहे.” असं म्हटलं आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button