मुलांच्या भविष्याच्या विचारात केली चिमुकल्यांची हत्या…

वडिलांना अटक,

मुंबई :- क्षयरोगाने त्रस्त. त्यात पत्नीसोबत होत असलेल्या सततच्या भांडणातून भविष्यात कमी जास्त झाल्यास पत्नी मुलांकडे दुर्लक्ष करेल. या भितीने वडिलांनीच त्यांच्या दोन चिमुरड्यांचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना सातारामध्ये उघडकीस आली. याप्रकरणी वडिल चंद्रकांत अशोक मोहिते (३७) यांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे.

मोहिते हा घाटकोपर पूर्वेकडील जगडूषा नगर येथे पत्नी आणि मुलगी गौरवी (११), मुलगा गौरव (७) यांच्यासोबत राहतात. तो क्षयरोगाच्या आजाराने त्रस्त होता. त्यात पत्नी सतत त्याच्यासोबत भांडण करायची. यातूनच आपल्या मत्यूनंतर पत्नी मुलांकडे बघणार नाही. मुलांचे काय होणार ? या विचारात मंगळवारी रात्री तो दोन मुलांना घेवून कारमधून साताराच्या दिशेने निघाला. सातारा नशनल हायवेलगतच कार थांबवून त्याने दोन्ही मुलांची गळा आवळून हत्या केली.

सकाळी ही कार सापडताच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानुसार, पोलिसांनी मोहितेला अटक केली आहे.