मुंबईतील ‘जिना हाऊस’ इंटरनॅशनल सेंटर बनण्याच्या मार्गावर

Jinnah house

मुंबई :- दिल्लीतील हैदराबाद हाऊसप्रमाणे आता मुंबईतील मलाबार हिल्स येथील जिना हाऊस देखील इंटरनॅशनल सेंटर बनण्याच्या मार्गावर बनणार आहे. दिल्ली येथील हैदराबाद हाऊसमध्ये ज्याप्रमाणे उच्चस्तरीय परदेशी शिष्टमंडळ आणि विशेष पाहुण्यांना, तसेच द्विपक्षीय चर्चेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, त्याचप्रमाणे आता मुंबईच्या जिना हाऊसचादेखील यासाठी वापर केला जाणार आहे.

पाकिस्तान जिना हाऊस कायदे-आजम यांचे घर असल्याचा दावा करत आहे. ते याला वाणिज्य दूतावास करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, मलबार हिल येथील भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा हे गेल्या सात वर्षांपासून जिना हाऊस सांस्कृतिक केंद्र बनवण्याची मागणी करत असून त्यांनी  वाद केंद्र सरकार पर्यंत नेला आहे. त्यावर आता पंतप्रधान कार्यालयातून ही वास्तू विकसित करून नवीन सुधारणा करण्यासंबंधीच्या सूचना मिळाल्या आहेत, असे लोढा यांनी सांगितले.तसेच ही वास्तू परराष्ट्र मंत्रालयाकडे सुपूर्त करण्यासंबंधी मजुरी देखील मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ही बातमी पण वाचा : ”पाकिस्तानी गायक असतो तर बर झालं असतं” म्हणत सोनू ने केली नाराजी व्यक्त