‘लोकल रेल्वे सुरू करा, अन्यथा…’ मनसेच्या आंदोलनाला मुंबईच्या डबेवाल्यांचा पाठिंबा

Mumbai Dabbawala - MNS

मुंबई : कोरोनाच्या (Corona) संकटात सर्वसामान्यांकरिता लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसेने सविनय आंदोलन पुकारले आहे. मनसेच्या आंदोलनाला मुंबई डबेवाला असोसिएशनने बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मनसेने आज सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला मुंबईच्या डबेवाल्यांनीही पाठिंबा दिल आहे. अनेक कार्यालये सुरू झाली असल्यामुळे डबे पोहचवण्यासाठी रेल्वे सुरू व्हावी, अशी मागणी डेबेवाल्यांनीही केली होती.

मनसेने (MNS) डबेवाल्यांच्या मागणीला उचलून घेतल्यामुळे मनसेचे आभारही डबेवाल्यांनी मानले आहे. आज मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी गनिमी कावा करत लोकलने प्रवास करून आंदोलनाला सुरुवात केली. महिन्यापूर्वी मुंबई डबेवाला असोसिएशन यांनी रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती की, लोकल सेवा बहाल करा, अन्यथा मुंबईच्या डबेवाल्यांची जेवणाचे डबे पोहचवण्याची सेवा अत्यावश्यक सेवा मानून त्यांना लोकलने प्रवास करू द्यावा; परंतु, दोन महिने झाले तरी रेल्वे प्रशासनाने कोणताच निर्णय घेतला नाही.

केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाने आमची अडचण समजून घ्यावी व डबेवाल्यांची सेवा आत्यावश्क मानून त्यांना लोकलने प्रवास करू द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने लोकलसेवा बहाल करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा मनसेप्रमाणे मुंबई डबेवाला असोसिएशनला लोकलने प्रवास करून सविनय कायदेभंग करावा लागेल, अशा शब्दांत सरकारला इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER