
मुंबई : आरेच्या मेट्रो कारशेडवरून भाजपा आणि शिवसेनेत सुरू असलेला वाद अजून फक्त सुरूच नाही तर रोज वाढतो आहे. यावरून भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर मुंबईकरांच्या प्रवासाची व्यवस्था मोडीत काढण्याचा आरोप केला.
ठाकरे सरकारच्या कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या कामाला केंद्र सरकारच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यानंतर ठाकरे सरकारने, पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या वांद्रे-कुर्ला संकुलात मेट्रोचे कारशेड उभारण्याचा पर्याय शोधणे सुरू केले आहे. यावरून आशिष शेलार यांनी, हा महाविकास आघाडी सरकार मुंबईकरांच्या प्रवासाची व्यवस्था मोडीत काढणे आहे, असा आरोप केला.
आशिष शेलार यांनी ट्विट केले –
●बुलेट ट्रेन नकोच म्हणताय
●मेट्रो होऊच नये अशी व्यवस्था करताय
आणि
●बेस्टचे खाजगीकरण करुन मुंबईकरांची महत्त्वाची व्यवस्था मोडित काढताय…?मुंबईकर हो!
ठाकरे सरकारचा हा तीन तिघाडा…
मुंबईकरांना भविष्यात प्रवासासाठी बहुतेक मिळणार “वातानुकूलित बैलगाडा!”— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 19, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला