कोरोना लसीच्या माध्यमातून मुंबईकरांना संजीवनी मिळणार – महापौर

Kishori Pednekar

मुंबई : कलियुगातील संजीवनी मुंबईत आली आहे. आता घाबरून जायचं कारण नाही. काळजी करू नका. आता घाबरू नका. काळजी करण्याचं काम नाही. मुंबईत कलियुगातील संजीवनी आली आहे. त्यामुळे कोरोनाचा खात्मा होणार असून मुंबईकरांना मोठी संजीवनी मिळणार आहे, असं मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी म्हटले आहे.

मुंबईत एकूण 1,39,500 लस आल्या आहेत. मुंबईत एकूण 1 लाख 30 हजार आरोग्य सेवकांची नोंदणी झाली आहे. मुंबईत 9 ठिकाणी लसीकरण केंद्र सज्ज करण्यात आले आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने आधीपासूनच तयारी केली होती, असं त्यांनी सांगितलं.

मुंबईत आज आलेली कोरोना लस मुंबईत परळच्या कोल्ड स्टोअरमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर इतर 9 केंद्रावर ही लस पाठवली जाईल, असं त्यांनी सांगितलं. कोरोना लसबाबत लोकांमध्ये काही प्रमाणात गैरसमज निर्माण झाल्याचं ऐकून आहे. काही लोक गैरसमज पसरवत असून हे योग्य नाही. लोकांनी या लसीबाबत गैरसमज पसरवू नये. तसेच नागरिकांनीही अशा अफवांना बळी पडून घाबरून जावू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER