बरेच हिशेब मुंबईकरांचे बाकी आहेत, त्यामुळे जाच तुम्ही घराघरांत : आशिष शेलार

Ashish Shelar - Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात विविध पक्षांकडून पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी विविध यात्रांचे व कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. राष्ट्रवादीपाठोपाठ राज्यभरात शिवसेना ही शिवसंपर्क अभियान राबवणार असल्याचे समोर येत आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

‘घराघरांत जाताय? जा जा, मुंबईकर तुमची वाटच पाहत आहेत. त्यांना विचारायचे आहे, कोरोनाला घाबरून घराघरांत लपून का बसला होतात? मुख्यमंत्र्यांसह सगळे तुम्ही तेव्हा कुठे होतात? एकही रुपयाची मदत का दिली नाहीत? अवाजवी वाढीव वीज बिले पाठवून का छळताय?’ असे सवाल शेलार यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केले. बिल्डर, दारूवाले, टाटाना सवलतीची खैरात, मग समान्य मुंबईकरांना काय दिलेत? समुद्राचे पाणी गोडे करायला निघालात, पावसाचे पाणी घरात घुसते त्याचे काय? आता उपनगरात एनए टॅक्स वसुली करून पाकीटमारी का करताय? असे बरेच हिशेब मुंबईकरांचे बाकी आहेत, त्यामुळे जाच तुम्ही घराघरांत!’ असे म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर प्रश्नांचा भडिमार केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER