मुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना टोला

Atul Bhatkhalkar - Aaditya Thackeray

मुंबई : कालच्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) मुंबईतील (Mumbai) सखल भागात पाणी साचले. पावसाचे पाणी घरामध्ये शिरल्याने अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. त्यावर भाजप (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना टोला लगावला. मंगळवारी रात्रीपासून तुफानी पावसामुळे आलेल्या पुरात मुंबईकर गळ्यापर्यंत बुडले तरी उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे पर्यटनात आणि ताजमहाल हॉटेलबरोबर करार करण्यात रमले आहेत, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

अनेक सखल भागांत पाणी साचले, उपनगरी रेल्वेसेवांवरही परिणाम झाला, अनेक घरांमध्ये पाणी शिरले. मुंबई महापालिकेने या पावसातही पुन्हा मुंबई तुंबून दाखवली. महापालिकेच्या भ्रष्टाचारामुळेच ही वेळ आली आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी यासंदर्भात केली आहे. ही टीका करणारा व्हिडीओ त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.

मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले. वस्त्यांमध्ये पाण्याचे लोट शिरले. गोरगरिबांचे संसार पुन्हा उद्ध्वस्त झाले. महापालिकेने मुंबई तुंबवून दाखवली. संततधार पावसात मुंबईकरांची परवड. महापालिका मख्ख, राज्य सरकार ढिम्म, मुंबईकर बेहाल…पण तरीही ते ‘घरी’च. दार उघड भावा दार उघड… असे म्हणत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER