कोरोनावर मुंबईकरांची स्वत: मात; मग पालिका , राज्य सरकारने काय केलं? – आशिष शेलार

ashish shelar

मुंबई : शहरातील तीन प्रभागांमध्ये झालेल्या अँटीबॉडी सर्वेक्षणात दिलासा देणारी माहिती पुढे आली आहे. आणि यावरून भाजपचे(BJP) आमदार आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी ने मुंबई महापालिका व राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. मुंबईतील सुमारे ४० टक्के लोकांना करोना(Coronavirus) होऊन ते आपोआप बरे झाले असतील तर राज्य सरकारनं काय करून दाखवलं,’ असा खोचक प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘यात तुम्ही काय करुन दाखवले?’ आशिष शेलारांचा सरकारला टोला

मुंबई हे राज्यातील करोनाचे हॉटस्पॉट असून, नीती आयोग आणि खुद्द महापालिकेनं अलीकडेच महापालिकेच्या तीन प्रभागांमध्ये अँटीबॉडी टेस्ट केल्या. त्यानुसार, झोपडपट्टीतील ५७ टक्के तर, इमारतींमधील १६ टक्के रहिवाशांना करोना होऊन गेल्याची माहिती पुढे आली आहे. तर, एका खासगी लॅबच्या पाहणीनुसार आतापर्यंत २५ टक्के मुंबईकरांनी स्वबळावर करोनावर मात केली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, ४० टक्के मुंबईकरांना करोना होऊन गेला आहे. त्यांनी स्वबळावर त्यावर मात केली आहे. मग राज्य सरकार आणि महापालिकेनं केलं काय, असा सवाल शेलार यांनी केला आहे.

तसेच लोक स्वत: आजाराशी लढत असताना मुंबई (Mumbai) महापालिकेनं प्रयत्न कमी पडू देऊ नयेत. लोकांचं यश स्वत:च्या नावावर खपवू नये. मुंबईत एक लाख अँटीबॉडी चाचण्या करा. सत्य समोर येईल, असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER