आगामी महापालिका निवडणूकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवेल – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil - Maharastra Today
Chandrakant Patil - Maharastra Today

पुणे : करांच्या स्वरुपात मिळालेला हजारो कोटींचा निधी खर्च करूनही मुंबईतील नालेसफाई होत नाही. कालच्या पावसाने मी सुद्धा मुंबईत अडकलो होतो. मुंबईची तुंबापुरी होते हे यावर्षीही दिसून आले, असं म्हणत आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला त्यांची जागा दाखवतील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

माध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले, माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी नेहमी सामान्य जनतेसाठी काही तरी वेगळं कार्य करत असतो. तीन हजार रिक्षाचालकांना कुपन, रेशन किटचे वाटप केले. वंचित घटकांसाठी मोफत लसीकरण सुरू केले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यात मोठा भाग घेतला आहे. राज्यातील कोरोना मृत्यूंची संख्या लपवली जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मृत्यूची संख्या जाहीर झालेली असताना त्यात एक लाख मृत्यूंचा फरक आहे. देशात राज्याचा वन थर्ड फरक आहे, असंही ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची बैठक संपन्न झाली. त्यात स्थानिक पातळीवरील निवडणुकीत मोदींचा फोटो न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यावर बोलण्यास पाटील यांनी बोलण्याचे टाळले. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. त्याबद्दल आनंद वाटला. मला याबाबत काहीच माहीत नाही, असं बोलून पाटील यांनी वेळ मारुन नेली. आरक्षण असो की अन्य काहीही राज्यातील आघाडी सरकारला काही करता येत नाही. दहा महिने झाले. मुख्यमंत्री मंत्रालयात पाय ठेवत नाहीत. यापेक्षा वेगळं काही होणार नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button