मुंबईचा अपमान सहन करणार नाही, रानौतने माफी मागितल्यास विचार करू – संजय राऊत

Sanjay Raut-Kangna Ranaut

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangna Ranaut) आणि शिवसेना यांच्यातील वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना रानौतला लक्ष्य केले.

कंगनानं महाराष्ट्राची (Maharashtra) माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु, तिने मुंबईचा उल्लेख मिनी पाकिस्तान (Pakistan) केला आहे. तिच्यात हिंमत असेल तर जे मुंबईबद्दल (Mumbai) बोलली तेच अहमदाबादविषयी बोलेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. मुंबादेवी आमचं आराध्य दैवत आहे. देवीच्या नावावर शहराला नाव मिळाले आहे. कंगनाने मुंबईचा अपमान केला आहे. तिने माफी मागितल्यास विचार करू असे राऊत म्हणाले.

दरम्यान, राऊत यांनी रानौतला लक्ष्य करत एक ट्विटही केले आहे. त्यात त्यांनी कंगनाचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांचा संपूर्ण रोख हा कंगनावरच असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ‘मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड चुका हूँ,’ असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

ह्या बातम्या पण वाचा : 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER