मुंबई : शिवसेनेच्या नगरसेवकाच्या प्रभागातच लसीकरण केंद्र सुरू; आशिष शेलार यांचा आरोप

Ashish Shelar

मुंबई : महानगरपालिकेने लसीकरण केंद्रांचे उद्घाटन आणि त्यांचं काम सुरू करण्याच्या बाबत भेदभाव केला आहे. २२७ वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात सोमवारपर्यंत १०१ वॉर्डांमध्ये केंद्र सुरू करण्यात आले. त्या १०१ केंद्रांपैकी ९० टक्क्यांच्या वर, ज्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला आहे त्या ठिकाणी लसीकरण (Vaccination) केंद्रांची सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणीच लसी उपलब्ध झाल्या आहेत, असा आरोप भाजपाचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शेलार म्हणाले – “माझ्या मतदारसंघात सहा प्रभाग समिती वॉर्ड आहेत. ज्या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक आहेत, त्या ठिकाणी लसी उपलब्ध झाल्या आणि लसीकरण केंद्रही सुरू झाले. पण भाजपाचे तीन नगरसेवक असलेल्या आणि अपक्ष नगरसेवक असलेल्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू झाले नव्हते आणि लसीही आल्या नव्हत्या! लस केवळ शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलेल्या भागातील लोकांनाच मिळेल का?”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button