विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याचे मुंबई विद्यापीठाचे निर्देश

Mumbai University

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांची सध्या सुरु असलेली शेवटची सत्रांत परीक्षा (Last Semister Exam) देत असलेल्या विद्यार्थ्यांना गरज असेल तेव्हा कॉलेजांनी वाढीव गुण (Grace Marks) द्यावेत, असे निर्देश विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयांना दिले आहेत.

ही  ऑनलाइन परीक्षा गुरुवारपासून सुरु झाली असून सुमारे २.७ लाख विद्यार्थी ती देत आहेत. प्रत्येक विषयासाठी ५० गुणांची ही अर्ध्या तासाची  परीक्षा आहे. यात विचारलेल्या प्रश्नांच्या अनेक पर्यायी उत्तरांपैकी एक बरोबर उत्तर  विद्यार्थ्यांनी निवडायचे आहे. अशी (Multiple Choice Questions) )  ऑनलाइन परीक्षा विद्यार्थी प्रथमच देत आहेत.

याआधी आधीच्या वर्षांच्या शिल्लक राहिलेल्या विषयांची ( ATKT) अशीच ऑनलाइन  परीक्षा घेण्यात आली तेव्हा अनेक महाविद्यालयांनी ५ ते १० टक्के विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचे दिसून आले. त्यामुळे आता हे निर्देश देण्यात आले आहेत. त्या भागातील प्रमुख कॉलेजच्या सल्ल्याने कॉलेजांनी योग्य असेल तेव्हा हे वाढीव गुण द्यायचे आहेत.

विद्यापीठाच्या नियमांनुसार अनुत्तीर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यांस वाढीव गुण देऊन उत्तीर्ण करता येत नाहीत. शिवाय परिक्षेच्या कमाल गुणांच्या एक टक्क्याहून किंवा एकूण पाचहून अधिक वाढीव गुण देता येत नाहीत.

विलंब व नव्या पद्धतीमुळे निर्णय

कॉलेजांमध्ये विद्यार्थ्याना हे विषय शिकविले गेले त्याला आता आठ महिन्यांचा काल लोटला आहे. मधल्या काळात विद्यार्थी त्यातील बर्‍याच गोष्टी विसरून गेले आहेत. शिवाय एरवीच्या लेखी परिक्षेत जेव्हा दीर्घोत्तरी उत्तरे लिहायची असता तेव्हा संपूर्ण उत्तर बरोबर आले नाही तरी थोडे तरी गुण मिळू शकतात.  शिवाय आधी लिहिलेले उत्तर, वेळ असेल तर सुधारण्याची संधी असते. बहुपर्यायी स्वरूपाच्याप् उत्तरांच्या स्वरूपात आणि शिवाय ऑनलाइन    होणार्‍या परिक्षेत ही संधी नसते. क्लिक केलेले उत्तर चुकीचे आहे हे नंतर लक्षात येऊनही ते बदलता येत नाही. शिवाय उत्तर चुकले की त्याचे सर्वच गुण गमवावे लागतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER