नव्या पद्धतीच्या परीक्षेच्या स्वरूपाबाबत सगळेच गोंधळलेले

Mumbai University

मुंबई : कोरोनाच्या (Corona) काळात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची तयारी सुरू आहे. मात्र, या परीक्षेत प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदललेले असेल.  या नव्या स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकांबाबत प्राध्यापक आणि विद्यार्थी दोघेही गोंधळले आहेत. या नव्या स्वरूपाच्या परीक्षेत ५० गुणांच्या पेपरमध्ये २५ ते ४० प्रश्न असतील व उत्तरे एमसीक्यू (मल्टिपल चॉईस क्वश्चन ) पद्धतीने द्यायची आहेत. अशी परीक्षा याआधी झाली नाही.  त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी नमुन्याची प्रश्नपत्रिका उपलब्ध नाही. यासाठी २०० – २५० प्रश्न तयार करावे लागणार आहे. हे काम कठीण आहे. शिवाय काही विषयात अशी प्रश्नपत्रिका तयार करता येणार नाही, असेही सांगितले जात आहे. विद्यार्थीही याबाबत गोंधळलेले आहेत. कारण या स्वरूपात पहिल्यांदाच परीक्षा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER