मुंबईत आता दोन मास्क लावणं बंधनकारक ; महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती

Maharashtra Today

मुंबई : करोना विषाणू मध्ये झालेला बदल पाहता हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने जे नियम ठरवले त्यानुसार मुंबईत आता दोन मास्क (Double Mask)लावणं बंधनकारक करण्यात आल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांनी दिली .

पालिके ने गेल्या एप्रिलपासून विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली. मुंबईकर दंडाच्या भीतीने मुखपट्टी लावत असले तरी अनेकदा ही मास्क हनुवटीवर किंवा नाकाखाली सरकवलेली असते. ऑक्टोबरमध्ये पहिली लाट ओसरल्यानंतर ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली. पालिके ने आतापर्यंत २७ लाख लोकांवर कारवाई करून आतापर्यंत ५४ कोटींचा दंड वसूल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button