दहिसर जमीन घोटाळ्यात दोन पोलीस अधिकारी निलंबित

पोलीस अधिकारी निलंबित

मुंबई : दहिसर येथील जमीन घोटाळा प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपात गृह खात्याने गेल्या आठवड्यात प्रशांत मर्डे (सहायक पोलीस यागी) आणि सुभाष सावंत (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) या दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले. सीबीआय (CBI) या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात सहा पोलीस कर्मचारी आहेत. मर्डे आणि सावंत लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीस पोलीस विभागाने निरीक्षक संजीव तावडे, सहायक निरीक्षक आनंद जाधव, काकासाहेब शिंदे आणि रेखा सायकर यांना निलंबित केले होते.

सीबीआयने फेब्रुवारीत आरोपत्र दाखल केले. त्यात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती.

याबाबत रोमेल हाऊसिंग एलएलपीचे संचालक ज्युड आणि डोमिनिक रोमेल यांनी तक्रार दिली होती. कम्युरुद्दीन शेख यांनी दोन खासगी कंपन्यांकडून ६० कोटी रुपयांचा मोठा भूखंड खरेदी केला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी १९७१ पासून त्यावर अधिकाराचा दावा केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER