मुंबई-ठाणे मेट्रो मार्गिका ४ प्रकल्प वेळेत पूर्ण होईल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

Uddhav Thackeray

मुंबई : मुंबईकरांसोबतच ठाणेकरांचाही दैनंदिन प्रवास आरामदायी आणि गतिमान होण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मेट्रो मार्गिका ४ आणि ४ अ प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली.

मुंबई मेट्रो मार्गिका ४ व ४ अ या प्रकल्पासाठी जर्मनीच्या केएफडब्लू विकास बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्ज करारावर मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव आणि जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत जे. मोहार्ड यांनी करारावर स्वाक्षरी केली.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुसह्य होण्यासाठी मेट्रोच्या प्रकल्पांना गती दिली जात आहे. मेट्रो मार्गिका ४ आणि ४ अ साठी केएफडब्ल्यू संस्थेने मंजूर केलेले भारतातील सर्वात जास्त रक्कमेचे कर्ज आहे. सुमारे दोन लाख प्रवासी दररोज ठाणे मुंबई प्रवास करतात. पुढील काही वर्षात मुंबईतील सार्वजनिक दळणवळण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून त्यामुळे मुंबईकराचं गतिमान प्रवासाचं स्वप्न साकार होईल.

मुख्यमंत्र्यांचे अपरमुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, ‘एमएमआरडीए’चे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. गोविंदराज आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER