शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांना सुप्रिम कोर्टाचा दिलासा ; EDच्या कारवाईला स्थगिती

Supreme Court - Pratap Sarnaik

‘ही लढाई एकट्या प्रताप सरनाईकची (Pratap Sarnaik) नाही. ही लढाई संपूर्ण महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) आहे. त्यामुळे फक्त शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नव्हे तर राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही मला पाठिंबा असल्याचा विश्वास दिला आहे,’ असं प्रताप सरनाईक म्हणाले.

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा देत ईडीला कारवाई न करण्याचे आदेश दिले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर अंमलबजावणी संचनालयानं अर्थात (ED) ईडीने कारवाईचा बडगा उगारला होता.

दिल्लीतून आलेल्या ईडीच्या पथकाने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर ईडीने चौकशीसाठी प्रताप सरनाईक यांना वारंवार नोटीसा बजावल्या होत्या. ईडीच्या कारवाई विरोधात प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने प्रताप सरनाईक यांची बाजू घेत दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईडीला कारवाई न करण्याचे आदेशच दिले आहे.

विशेष म्हणजे, प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग सरनाईक यांनी मंगळवारी संध्याकाळी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. यावेळी सरनाईक यांनी ईडीकडून होणाऱ्या चौकशीबाबतही आक्रमक भाष्य केलं होतं. ‘ही लढाई एकट्या प्रताप सरनाईकची नाही. ही लढाई संपूर्ण महाविकास आघाडीची आहे. त्यामुळे फक्त शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे नव्हे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मला पाठिंबा असल्याचा विश्वास दिला आहे,’ असं प्रताप सरनाईक म्हणाले.

‘माझ्यावर आरोपपत्र दाखल झालेलं नाही. एका फिर्यादीने माझं नाव घेतल्याने मला ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. मी पळून जाणारा नाही. ईडीकडून जेव्हा चौकशीसाठी बोलावलं जाईल, तेव्हा मी नक्की जाणार आहे. मी काहीही गुन्हा केलेला नाही. मेहनत आणि आत्मविश्वास यामुळे आज मी उभा आहे,’ असं म्हणत सरनाईक यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER