कोरोनामुळे मृत्यू वाढले; अंत्यविधीसाठी पहावी लागते तासंतास वाट

COVID 19 Death - Crematorium

मुंबई : कोरोनाच्या (Corona) रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत असल्याने स्मशानघाटावर अंत्यविधीसाठी संबंधितांना तासन्तास ताटकळत रहावे लागते. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मुंबईत रोज तीस – पस्तीस मृत्यू व्हायचे. आज ही संख्या रोज पस्तीस – पन्नास झाली आहे. यामुळे अंत्यविधीसाठी रुग्णांच्या नातेवाईक – मित्रांना कधी – कधी सहा तास ताटकळत रहावे लागते.

मुंबई मनपाच्या मार्गदर्शक नियमानुसार कोरोनाच्या रुग्णांचा अंत्यविधी विद्युतदाहिनीतच केला पाहिजे. शिवाजी स्मशान घाटात दोन विद्युतदाहिनी आहेत. दहन आणि दाहिनी थंड होण्यासाठी किमान अडीच तास लागतात. येथे हिंदुजा, सुश्रुत, केईएम, नायर आणि एसएल रहेजा रुग्णालयात निधन झालेल्या कोरोना रुग्णांचे शव अंत्यसंस्कारासाठी येतात. येथील कर्मचाऱ्याने सांगितले की, येथे रोज अंत्यसंस्कारासाठी वीस ते चोवीस शव येत असतात. जनूपासून ही संख्या चाळीसवर गेली आहे. गर्दी वाढल्यामुळे मृतकांच्या अंत्यविधीची वाट पाहणाऱ्या संबंधितांची रांग स्मशानाच्या बाहेर, रस्त्यापर्यंत जाते.

भोईवाडा स्मशानघाटावर केईएम आणि नायर रुग्णालयातील शव आणली जातात. रोज सरासरी वीस शव येतात. १४ सप्टेंबरला येथील शवदाहिनीची चिमणी तुटल्यामुळे ती बंद करण्यात आली. आता येथील शव वरळी, शिवाजी पार्क, रेय रोड, सायन आणि चंदनवाडीला पाठवण्यात येतात.

वरळीच्या स्मशानघाटावर दोन विद्युतदाहिनी आहेत. येथे रोज आठ शव येत असल्याने प्रतीक्षा सूची नाही.

जूनपर्यंत मुंबईत रोज कोरोनाच्या शंभर – दीडशे रुग्णांचा मृत्यू होत होता. ऑगस्टमध्ये हे प्रमाण कमी झाले. पण १ सप्टेंबरपासून कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण पुन्हा वाढले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER