
दिल्लीच्या एका गणेशभक्ताने मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरास ३५ किलो सोने दान म्हणून दिले आहे. या सोन्याची किंमत १४ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
२१९ वर्षाच्या इतिहासात सिद्धिविनायक मंदिराला पहिल्यांदाच एखाद्या भक्ताने एवढ्या रकमेची वस्तू दान दिली. १५ ते १९ जानेवारी दरम्यान शेंदूर लेपणासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते.
जे सोने दान मिळाले त्यातूनच मंदिराचा गाभारा, दरवाजा आणि घुमटाला सोन्याचा मुलामा चढवण्यात आल्याचे बांदेकर यांनी सांगितले.