मुंबईला मी POK नाही, सिरीया म्हणायला हवं होतं; आता कंगनाचा राहुल गांधींशी पंगा

Rahul Gandhi - Kangana ranaut

मुंबई :- सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर कंगना रणौत (Kangana Ranaut) माध्यमांमध्ये सातत्याने चर्चेत आहे. तिच्या वक्तव्यामुळे अवघ्या देशाचे तिने लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार, शिवसेना नेते संजय राऊत, बॉलिवूडमधील (Bollywood) दिग्गज दिग्दर्शक, अभिनेत्यांवर ती प्रहार करत आहे.

मुंबई (Mumbai) मला पाकव्याप्त काश्मीर वाटते, असे कंगनाने विधान केल्यानंतर ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि तिच्यात चांगलेच युद्ध पेटले होते.

एवढेच नाही तर मुंबई महापालिकेने तिचे कार्यालयदेखील तोडले. कंगनाने आतापर्यंत अनेक मोठे कलाकार तसेच शिवसेना नेते संजय राऊत, कॉंग्रेसच्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांवर तिने निशाणा साधला. हा वाद अजूनही शमलेला नसतानाच आता तिने राहुल गांधींना निशाणा केला आहे.

कंगना म्हणाली, “मला मुंबई सुरक्षित वाटत नसल्याचे म्हटले होते, तर माझ्यासाठी अपशब्द वापरण्यात आले. माझं कार्यालय उद्ध्वस्त केलं. माझं तोंड फोडण्यात येईल अशी धमकी मला देण्यात आली होती. मला शिव्या दिल्या होत्या. अभद्र टिप्पणी केली होती. मी फक्त एवढंच म्हटलं होतं की, मला मुंबई पीओकेप्रमाणे वाटते. याचा फायदा उचलण्यात आला. मला त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी पीओके म्हटलं होतं, पण मला आता असं वाटतं की, मी सिरीया म्हणायला हवं होतं. कारण जर राहुल गांधी यांनी भारताची तुलना सिरीयासोबत केली होती, तेव्हा त्यांना कोणी त्रास दिला नाही, त्यांचं घर तोडलं नाही. शेवटी या लोकांना कसली अडचण आहे?” असे म्हणून कंगनाने आता राहुल गांधींशी (Rahul Gandhi) पंगा घेतलेला दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने घेतलेल्या मुलाखतीत कंगना बोलत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER