शिवसेना ईडी (ED) विरोधात आक्रमक; ५ जानेवारीला जोरदार शक्तिप्रदर्शनाची शक्यता

Shivsena & ED

मुंबई : प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नीलाही सक्तवसुली संचालनालयने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ईडीविरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरू आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांची ५ जानेवारीला ईडीकडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ५ जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाइंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार असल्याची माहिती मिळतेय. गेल्या काही दिवसांत शिवसेना नेत्यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्यामुळे शिवसेनेने आता ईडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER