धनंजय मुंडेंनाही बसला मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका

Dhananjay Munde

मुंबई : मुंबईसह राज्यभरात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबलं असून अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनाही मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका बसला.

मुंडे काल तीन तास ईस्टर्न फ्री वेवर अडकले होते. मुंबईत काल (५ ऑगस्ट) आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते काल परळीवरून  (बीड)  निघाले होते. मात्र, पावसामुळे असे अडकल्याने त्यांना बैठकीलाही हजर राहता आले नाही.

ही बातमी पण वाचा : मे महिन्यातच बोललो होतो, पावसात पूर्ण मुंबई शहर बुडेल – संजय निरूपम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER