मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तास बंद

Mumbai-Pune Expressway closed for two hours today

पुणे (प्रतिनिधी) :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि. २३) दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक दोन तास बंद ठेवणार आहे. हलकी व इतर प्रवासी वाहने कुसगाव टोलनाका येथून जुन्या महार्गावरून वळविणार असल्याची माहिती महामार्ग पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.

द्रुतगती मार्गावर दुपारी १२ ते २ या वेळेत पुण्याकडे येणाºया लेनवर ओव्हर हेड गॅन्ट्री बसविण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. या दरम्यान सर्व प्रकारची अवजड व माल वाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील खालापुर टोलनाका व कुसगाव टोलनाक्यापूर्वी थांबविणार आहेत. तर हलकी चारचाकी व इतर प्रवासी वाहने कुसगाव टोलनाका येथून जुना मुंबई-पुणे महामार्गाने पुण्याकडे वळविणार आहे. मुंबईहून पुण्याकडे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मोहिते यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तीन दिवस पाऊस