जनतेने संयम ठेवावा; जितेंद्र आव्हाडांचे आवाहन

Jitendra Awhad - Mumbai Power Cut

मुंबई : मुंबईमध्ये (Mumbai) वीजपुरवठा अनेक ठिकाणी खंडित झाला आहे. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे माहिती आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जनतेला संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

आव्हाड यांनी मुंबई, ठाणे, पनवेल, नवी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ट्विटरवरुन यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “मुंबई तसेच ठाणे व आसपासच्या परिसरातील वीज पुरवठा काही तांत्रिक खारणांमुळे तात्पुरता खंडित झाला असून त्यावर दुरुस्तीकरीता तातडीने पावले उचलली जात आहेत. जनतेने संयम ठेवून सहकार्य करावे ही विनंती, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान मुंबईसह उपनगरांत गेल्या १ तासापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. इतका वेळ वीज पुरवठा खंडित होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं बोलले जाते . अचानक वीज पुरवठा ठप्प झाल्यानं लोकलसह, परीक्षांवरही परिणाम झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER